'ऑस्ट्रेलियामध्ये भेटू'; Down Under दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल टी नटराजनचे डेविड वॉर्नरने केले अभिनंदन, दिला खास संदेश (Watch Video)
भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचा यॉर्कर किंग टी नटराजनचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला आहे. बोर्डाने खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर लगेचच सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने 29 वर्षीय वेगवान गोलंदाजाचे अभिनंदन केले. वॉर्नर म्हणाला, “अभिनंदन नट्टू. मी तुला ऑस्ट्रेलियामध्ये भेटतो.”
India Tour of Australia 2020-21: भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour of Australia) आयपीएल (IPL) फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचा यॉर्कर किंग टी नटराजनचा (T Natarajan) पहिल्यांदा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी सुधारित संघाची घोषणा केली. सुरुवातीला बॅकअप बॉलर म्हणून प्रवास करणाऱ्या नटराजनला खांद्याच्या दुखापत झालेल्या वरुण चक्रवर्तीच्या जागी आंतरराष्ट्रीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे. आयपीएल 2020मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) नटराजनने शानदार प्रदर्शन करत निवड केली गेली. सुरुवातीला भारतीय निवडकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. तामिळनाडूच्या वेगवान गोलंदाजाने 8.02 च्या इकॉनॉमीने 16 विकेट काढल्या. दरम्यान, भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर लगेचच सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warnre) 29 वर्षीय वेगवान गोलंदाजाचे अभिनंदन केले. एसआरएच ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या अलीकडील व्हिडिओमध्ये वॉर्नरने या वर्षाच्या आयपीएलच्या अनुभवाबद्दल सांगितले ज्यात त्याने नटराजनचा उल्लेख केला. (IND vs AUS Series 2020-21: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील 'या' मॅचसाठी स्टेडियममध्ये येणार 27 हजार प्रेक्षक, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा)
व्हिडिओच्या अखेरीस वॉर्नर म्हणाला, “अभिनंदन नट्टू. मी तुला ऑस्ट्रेलियामध्ये भेटतो. सर्वांना धन्यवाद. बाय.” आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवासह हैदराबादचे 13व्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले. सामना संपल्यानंतर वॉर्नरने संपूर्ण हंगामात नटराजनच्या योगदानाचे कौतुक केले आणि त्याला ‘या मोसमातील शोधा’ असे म्हटले. नटराजनच्या घातक यॉर्कर्स आणि चमकदार डेथ गोलंदाजीमुळे क्रिकेटपटू-भाष्यकार मुरली कार्तिक इतके प्रभावी होते की त्यांनी त्याचे ‘यॉर्कर नटरजन’ असे नाव ठेवले. पाहा वॉर्नरचा व्हिडिओ:
दरम्यान, आयपीएल फायनल संपुष्टात येताच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. 27 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या वनडे मालिकेशी दौऱ्याची सुरुवात होईल, तर त्यानंतर टी-20 मालिका आणि अखेरीस बहुप्रतीक्षित टेस्ट सिरीज खेळली जाईल. बीसीसीआयने नुकतंच सुधारित कसोटी संघ जाहीर केला असून रोहित शर्माचा समावेश केला आहे. रोहितला फक्त कसोटी संघात स्थान देण्यात आले आहेत, तर वनडे आणि टी-20 मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात अली आहे. शिवाय, भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली अॅडिलेड येथील पिंक-बॉल टेस्टनंतर भारतात परतेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)